
आपले तरुण बागायतदार श्री अनिरुद्ध यांनी एक संदर्भ उपलब्ध करुन दिला. बागलकोट फलोत्पादन कॉलेज मधील ते संशोधन आहे. त्याचे सार पुढील प्रमाणे….
एकूण २४ बुरशीनाशके लॅब आणि प्रत्यक्ष प्लॉट वर वापरून पाहण्यात आली.
३. जैविक पैकी. Trichoderma हर्जनियममुळे colleotriticum रोगट बुरशीचे चांगले नियंत्रण मिळाले. सुडोमोनास व बॅसिलस ही जैविक बुरशीनाशके फारशी प्रभावी नाहीत.
Systemic म्हणजे आंतर प्रवाही बुरशी नाशके पैकी Propiconazole (टील्ट) सर्वात प्रभावी ठरले.
हेक्साकोनाझोल (काँटाफ) / क्रेसॉक्सीन मिथाइल (एर्गोन)/इप्रोबेन्फोस (किटाजीन)
ही काही प्रमाणातच उपयुक्त ठरली. तर अझोस्ट्रोबिन (अमिस्टार) अत्यलप नियंत्रण करू शकले नाही Systemic पैकी कार्बेन्डाझिम (bavistin) हे mancozeb सोबत फार प्रभावी ठरले
Contact पैकी Mancozeb बुरशीनाशक हे colletrotichum रोगवर सर्वात प्रभावी ठरले. तसेच झायनेब हे ही खूप प्रभावी ठरले. झयनेब गटातीलच प्रोपिनेब (अंट्रॅकॉल) मात्र फार कमी रोग नियंत्रण करु शकले. कॅप्टन हे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक चांगले काम करते. याचा विचार करता. आपल्याला असा शेडुल करता येईल.
Mancozeb + Carbendazim
Zineb (झेड 78) + propiconazol (टील्ट)
कॅप्टन + क्रेसोझिम मिथैल किंवा किटाझिन
Trichoderma फवारणी आणी इतर बुरशीनाशक यांचे फवारणी अंतर कसे ठेवावे म्हणजे trichoderma मरणार नाही. हे मला कळले नाही.
प्रयोग आपणच करावेत. बागलकोट कॉलेजच्या वनस्पती रोग तज्ञ यांना मानाचा मुजरा. त्यांना जावून भेटणे किंवा आपलेकडे प्रशिक्षणला बोलविने गरजेचे. अधिक माहिती मिळेल.